सोयगाव, (प्रतिनिधी): सोयगाव शहराच्या विकासाला गती देणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सोमवार (दि.३) रोजी उत्साहात झाले.
आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातुन यावेळी जवळपास ८३ लाख रुपयांच्या मंजूर निधीतून भवानी माता मंदिरासमोरील सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन, खंडेराव महाराज मंदिर येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण, वॉर्ड क्रमांक १५ मधील दिलीप बिर्ला यांच्या दुकानापासून ते अस्लम पिंजारी यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे लोकार्पण, नवीन
रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.
आमदार अब्दुल सत्तार यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, सोयगाव शहराचा सर्वांगीण विकास हा आपला ध्यास असून नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून अधिकाधिक निधी आणण्याचे काम सातत्याने सुरू आहे.
सोयगावच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर (आबा) काळे, नगराध्यक्ष आशाबी तडवी, शिवसेना तालुकाप्रमुख धरमसिंग चव्हाण, शहरप्रमुख संतोष बोडखे, युवासेना पदाधिकारी कुणाल राजपूत, अमोल मापारी, मुख्याधिकारी संभाजी देशमुख, शिवसेना गटनेते अक्षय काळे, नगरसेवक कादिर शहा, रउफ शेख, राजू दुतोंडे, दीपक पगारे, गजानन माळी, किशोर मापारी, अशोक खेडकर, भगवान जोहरे, बंटी काळे, लतीफ शहा, रमेश गावंडे, समद शहा, रउफ देशमुख, दिलीप बिर्ला, रमेश चौधरी, संदीप चौधरी, वामन जावळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












